खोटारडे लोकांनी सेनेवर खोटारडेपणाचा आरोप करू नये; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

0

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अधिक वाढला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून शिवसेनेवर आरोप केले. महायुतीत लढून त्यानंतर शब्द सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत प्रथम शिवसेनेने दगा दिल्याचे आरोप फडणवीस यांनी केले. त्यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपने खोटे बोलू नये, भाजप खोटे बोलत असून शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप करत आहे. शिवसेनेवर पहिल्यांदा कोणीतरी खोटेपणाचा आरोप करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल असा शब्द दिला होता. तो शब्द मी पूर्ण करण्यासाठी भाजपकडून ५०-५० चा शब्द घेतला होता. मात्र तो शब्द आता भाजप फिरवीत असल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आजपर्यंत भाजपचे नटे खोटे बोलत आले आहे. १५ लाख रुपये देण्याचे, काळा पैसे परत आणण्याचे, रोजगार देण्याचे आश्वासन कोणी? दिले होते. यावरून कोण खोटे बोलत आहे हे दिसून येते.

गंगा साफ करता करता यांचे मन कुलुशीत झाले असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केले. सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जायला भाजपवाले तयार आहेत हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.