गजानन महाराज प्रगटदिन सोहळा उत्साहात

0 2

पिंपरी-अनंतकोटी ब्रह्मांड नायक । महाराजाधिराज योगीराज । परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतीपालक । शेगाव निवासी समर्थ सद्गुरू । श्री संत गजानन महाराज की जय ।।, ‘जय गजानन माउली’, ‘गण गण गणात बोते’ या आणि अशा जयघोषात सोमवारी २५ रोजी गजानन महाराज प्रगटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील गजानन महाराजांच्या विविध मंदिरांत प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पहाटेपासूनच अभिषेक, काकडा भजन, आरती, गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, भागवत कथा, पाद्यपूजा, रुद्राभिषेक यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.