गडकरींच्या आदेशानंतर औरंगाबाद-जळगाव महामार्ग दुरुस्तीला वेग !

0

जळगाव: पावसाळ्यात औरंगाबाद-जळगाव महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. प्रवाश्यांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. याबाबत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ८ दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतर आता रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या कामाला वेग आला आहे. याबाबत स्वत: नितीन गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

औरंगाब्द-सिल्लोड-जळगाव महामार्गाची दुरुस्ती सुरु असून लवकरच त्यामुळे प्रवाश्यांची सोय होणार आहे.