गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या बंदला हिंसक वळण

0


गडचिरोली: गेल्या महिन्यातील चकमकीच्या विरोधात आज नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागेले असुन, आज बंद दरम्यान नक्षलवाद्यांनी वखारीतील एक ट्रक पेटवल्याची घटना समोर आली आहे. तसेच एटापल्ली ते आलापल्ली रस्ता बंद केला असून त्या रस्त्यावरील झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच त्यांनी वनविभागाची लाखो रुपयांची लाकडे पेटवून दिली आहे, यामुळे स्थानिक रहिवाशामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या विरोधात आज नक्षलवाद्यांनी आज बंद पुकारला असून, त्यात त्यांनी मोठे नुकसान केले आहे. दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलगाना या राज्याच्या सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी रस्त्यामध्ये झाडे तोडल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बसेस एटापल्लीतच खोळंबल्या आहेत. या दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील कालेश्वर मेडीगड्डा प्रकल्पाला भेट देणार असल्याने तेलंगणाच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे.