Tuesday , March 19 2019

गणपती मंडळांसाठी ’एक खिडकी’ योजना राबवा

सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा

महापौर राहुल जाधव यांचे प्रशासनाला आदेश

पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांनी ‘सारथी’ हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यात यावा, विविध कामांसाठी पालिकेत येणार्‍या नागरिकांशी सौजन्याने वागणूक वागावे, त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, तसेच साथीचे आजार होऊ नये यासाठी औषध फवारणीसह विविध उपाययोजना कराव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.तसेच अंदाजपत्रकातील कामे वेळेत पुर्ण करावीत. गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबविण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

सर्व विभाग प्रमुखांची बैठक

महापौरपदी निवड झाल्यानंतर राहुल जाधव यांनी बुधवारी पालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीला ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसेविका साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्यलेखापाल राजेश लांडे, मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

दहा दिवसांनी घेणार आढावा

ड्रेनेज व पावसाळी गटारांचे प्रश्‍न उदभवू नये याची दक्षता घ्यावी. विद्युत विषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरण समवेत संबधित अधिकार्‍यांनी बैठक घेऊन धोकादायक डीपीबाबत उपाययोजना कराव्यात. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. शहरातील आरोग्य विषयक दक्षता घेण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी करून डेंग्यू सारख्या आजारांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी उपाय योजना कराव्यात. शहरातील कचरा दररोज गोळा करण्यात यावा. हॉकर्स झोनचा प्रश्‍न लवकर मार्गी लावावा. पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. मोकाट, उपद्रवी पाण्यांचा बंदोबस्त करण्यात यावे, असे निर्देश महापौर राहुल जाधव यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. तसेच दहा दिवसानंतर याचा आढावा घेणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बेदरकार वाहने चालविणे पडणार महागात

वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार पुणे : नो एंट्रीमधून भरधाव वाहने चालविणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!