गरजूंना किराणा मालाचे वाटप

0

जामनेर। येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच गेंदाबाई मोहनलाल लोढा (मोहन भुवन) प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोदकुमार लोढा यांच्यातर्फे कोरोना या संसर्ग रोगाच्या संकटकाळी निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून गरजूंना धान्य तसेच किराणा मालाचे वाटप करून मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले जात आहे.

विनोदकुमार लोढा यांनी शहरातील नगारखाना, एकलव्य नगर, माणिक बाग येथील मांगारवाडी वस्ती, स्मशानभुमी जवळील मातंग वाडा, तसेच विविध परिसरात आतापर्यन्त 12 दिवसांमध्ये 1हजार नग सुमारे नऊ हजार रुपयांचे सफेद रुमाल, एक लाख 32 हजार रुपयांचे राशन किट असे 1हजार राशन किट अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा हे शहरात अशा संकट व आपत्कालीन समयी नेहमीच पुढाकार घेऊन गरजूंंना मदत करीत आले आहेत. यावेळी दिपक देशमुख, सुजित सैतवाल, रतन सिंह राणा, पवन माळी, जितू पालवे, मिलींद लोखंडे , जितू गोरे, राजू जाधव, देशपांडे आदी उपस्थित होते.