गरजूंना व रूग्णांना जेवण देत मुक्ताईनगरात हनुमान जयंती साजरी

0

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथे समाज कार्यात सतत पुढे असणार्‍या वंदे मातरम ग्रुपच्या तरुण सदस्यांनी पुढाकार घेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने परप्रांतीय त्याचप्रमाणे शहरातील गरजू लोकांना शहरात फिरुन अन्नदान केले. यावेळी एका वाहनामध्ये जेवणाचे पार्सल बनवून शहरातील प्रत्येक रुग्णालयात जावून रुग्णांसाठी भोजन पुरविण्यात आले. यावेळी सकाळ व संध्याकाळ 300 ते 400 गरजूंची भूक मागविण्यात आली. आज हनुमान जयंती असल्याने नुतन मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. वीरेंद्र भोईटे यांनी या कार्यात मोलाचा वाटा स्वीकारून अन्नदानाची जबाबदारी स्विकारली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज रुग्णालयांत रुग्णांना खिर, पुरी मोतीचूराचे लाडू, गंगाफळाची भाजी असे पदार्थ असलेले जेवण देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार श्याम वाडकर व नायब तहसीलदार प्रदिप झांबरे, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, डॉ.योगेश राणे, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, प्रदीप काळे यांनी स्वतः जेवण वाढले. भिला वाणी व त्यांच्या परीवाराने कोणत्याही मोबदला न घेता गरजु करिता रुचकर आणि स्वादिष्ट जेवण हे तयार करून दिले. या सामाजिक कार्यात मुक्ताईनगर येथील वंदे मातरम ग्रुपच्या सदस्यांचे मोठे योगदान होते. वंदे मातरम ग्रुपचे धनंजय सापधरे, संजय कपले, भिला वाणी, शुभम तळेले, राहुल शुरपाटणे, अमरदीप पाटील, सुमित बोदडे, विश्वनाथ घुले, भिकन शेख, शंकर बोराखेडे, दिपक खेवलकर, सुनिल सुरपाटने, विशाल देशमुख, कलिम पिंजारी, आशिष भंसाली, स्वप्निल श्रीखंडे, जाकिर भाई यांनी संपूर्ण शहरात फिरुन अन्नदान केले.

रुग्णांना दिले जेवण
यावेळी उपजिल्हा रुग्णालय, पाचपांडे हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल, श्रीराम मॅटर्निटी नर्सिंग होम, कुसुमश्री नर्सिंग होम, डॉ.राहुल ठाकोर यांचे मुक्ताई हॉस्पिटल, शोभा हॉस्पिटल, आरोग्यम हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, ात्सल्य बाल रुग्णालय या हॉस्पिटल मध्ये रुग्णांना जेवण पुरविण्यात आले. यावेळी अन्नदाते विरेंद्र भोईटे व समाज सेवकांचे यावेळी रुग्णांनी आभार मानले. तसेच वंदे मातरम ग्रुपच्या या रोजच्या समाजसेवेचे शहरातील सर्वच स्तरातून सध्या कौतुक होत आहे.