गांधीजींची पुण्यतिथी: मोदींसह दिग्गजांनी वाहिली राजघाटावर श्रद्धांजली !

0

नवी दिल्ली: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त राजघाटावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदींनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी देखील राजघाटावर जाऊन गांधीजींना आदरांजली वाहिली.