गाते ग्रामपंचायतीतर्फे जीवन ड्रॉपचे वाटप

0

खिर्डी : तांदलवाडीपासून जवळ असलेल्या गाते येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागा मार्फत जीवन ड्रॉप या पाणी शुध्दीकरण औषधीचे घरोघरी जावुन वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत शिपाई योगेश नारखेडे, आशा वर्कर आशा तायडे व मनीषा चौधरी आदी उपस्थित होत्या.