गाळे लिलावासाठी रेडीरेकनरनुसार होणार मूल्य निश्चित

0

जिल्हाधिकार्‍यांसह त्रिसदस्यीय समिती; 19 रोजी बैठक

जळगाव – मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाची हालचाल सुरु आहे.लिलावासाठी रेडीरेकनरनुसार मूल्य निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांसह त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून 19 रोजी बैठक होणार आहे. 30 वर्षासाठी लिलाव केले जाणार आहे.

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गाळेधारकांकडून थकीत रक्कम वसुलीसाठी मनपा प्रशासनाकडून कलम 81 ब नंतर कलम 81 क नुसार कारवाई सुरू आहे. महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमध्ये आता पर्यंत 42 गाळे सील केले आहेत. तर गाळेधारकांकडून जवळपास 60 कोटींची थकबाकी वसुल केली आहे.

लवकरच लिलावाची प्रक्रिया

गाळ्यांचा लिलाव करण्याच्या अनुषंगाने मूल्य निर्धारित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे व मुद्रांक विभागाचे सह जिल्हा निबंधक गायकवाड यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली