गावठी कट्ट्यांसह दोघे जाळ्यात

0

धुळे । शहरात एकाच दिवशी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसासह दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. शहरातील पारोळा चौफुली भागातून मयूर उर्फ बबुवा सुरेश कंडारे (32, अहिल्यदेवी नगर, चितोड रोड, धुळे) यास गुरुवारी दुपारी दिड वाजता अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल तसेच 800 रुपये किंमतीचे दोन काडतुस जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीनुसार आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर शिंदे, पंकज चव्हाण, मच्छिंद्र पाटील, कुणाल पानपाटील, दिनेश परदेशी, समीर पाटील, योगेश गीते, मनोज बागुल, उमेश पाटील, दीपक पाटील, पंकज पाटील, उमेश चव्हाण, विजय शिरसाठ आदींच्या पथकाने केली.

दुसर्‍या कारवाईत दोन कट्ट्यांसह सहा काडतुस जप्त
अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या दुसर्‍या कारवाईत गल्ली नंबर पाचमधून मंगल गिरधर गुजर (घड्याळवाली मशीदजवळ, धुळे) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 51 हजार 200 रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे तर सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध आरीफ उस्मान शेख यांनी आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक सुनील भाबड, अनिल पाटील, सुनील विंचूरकर, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, मनोज बागुल, उमेश पवार, मधुर पाटील, विलास पाटील, आकांशा गायकवाड यांच्या पथकाने केली.