गावठी दारूची विक्री : भुसावळ तालुका पोलिसांनी दाखल केला एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीतील मांडवेदिगर ते भिलमळी दरम्यान संशयीत आरोपी किशोर दरबार पवार (रा.मांडवेदिगर, ता.भुसावळ) याच्या ताब्यातून सहा हजार 300 रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू असताना जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघण तसेच मुंबई प्रोव्हीशन अ‍ॅक्ट अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, विठ्ठल फुसे, युनूस मुसा, राजेंद्र पवार यांनी केली.