गुगलसोबत मिळून रिलायन्स आणणार 5-जी स्मार्टफोन; अंबानींची मोठी घोषणा

0

मुंबई: शेअर मार्केटमध्ये रिलायन्स गृपचे शेअर तेजीत होते. यावरून अंबानी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी घोषणा करू शकतात असल्याचे बोलले जात होते. रिलायन्स इंडस्ट्रीचा 43व्या एजीएम (आरआयएल 43 वा एजीएम 2020) सुरू झाला आहे. मुकेश अंबानी यांनी गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. नवीन जिओ टीव्हीची घोषणा देखील त्यांनी केली आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असतील. नवीन जिओ टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार यांसारखे सर्व ओटीटी चॅनेल असतील.

आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लाइव्ह फोनची विक्री झाली आहे. परंतु तरीही फीचर फोन युजर्स स्मार्टफोन येण्याची वाट पाहत आहेत. आमचा विश्वास आहे की आम्ही एन्ट्री लेव्हलला 4जी आणि 5जी स्मार्टफोन बनवू शकतो. आम्ही असा फोन डिझाइन करू शकतो, ज्याची किंमत सामान्य स्मार्टफोनपेक्षा कमी असेल. तसेच गुगल आणि जिओ मिळून एक व्हॅल्यू इंजिनियर्ड अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार असल्याचे अंबानी यांनी जाहीर केले.

गुगल जियोमध्ये भाग घेईल – जियो प्लॅटफॉर्ममध्ये गुगल 33737 कोटी रुपयांमध्ये 7.7% हिस्सा खरेदी करेल. मुकेश अंबानी म्हणाले की, आरआयएल ही 150अब्ज डॉलर्सची पहिली कंपनी बनली आहे. कंपनीचा एब्टिडा 1 लाख कोटी झाला आहे. एबिटडा ग्रोथ रेटमध्ये 49 टक्के वाढ झाली आहे.