‘गुन्हेगाराला माझ्या समोर जाळा’; पीडितेच्या वडिलांचा संताप !

0

वर्धा: जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत मुलीवर उपचार सुरु होते. मात्र मृत्यूशी झुंज देण्यात तरुणी अपयशी ठरली. आज सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. तरुणीच्या मृत्यूने समाज मन सुन्न झाले आहे. गुन्हेगाराला शिक्षा होऊन न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्थरातून होत आहे, मात्र पिडीतेच्या वडिलांनी आरोपीला “माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा,” अशी मागणी केली आहे.

“माझ्या मुलीला जसा त्रास झाला तसा त्रास आरोपीला झाला पाहिजे,” अशी भावना मुलीच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. “त्याला जिवंत जाळलं पाहिजे. त्याला जनतेसमोर आणले पाहिजे अशी मागणी पिडीत तरुणीच्या वडिलांनी केली आहे.