गुन्हेगारी ठेचण्यासह भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यावर भर

0

धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ यांची ग्वाही

धुळे- धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांची ठाणे शहर उपायुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागेवर पुसदचे डॉ.राजु भुजबळ यांची बदली करण्यात आली होती. भुजबळ यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ.भुजबळ म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यावर पोलिस प्रशासनाचा भर राहणार असून शहरातील गुन्हेगारी ठेचून काढली जाईल. नागरीकांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासह गुन्हेगारांवर कठोर कारवाईला प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.