शाहु महाराज रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्यात यावे

1

महानगर राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


जळगाव: महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव महापालिका अंतर्गत असलेल्या शाहु महाराज हॉस्पिटलबाबतचा करार रद्द करून तो पीपीपी तत्वावर देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. महानगर राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात जवळपास 5.50 ते 6 लाख लोकसंख्या आहे. जळगाव महापालिका अंतर्गत असलेल्या शाहू महाराज हॉस्पिटल हे शहराच्या मध्यवर्ती भागी आहे. परंतु मागील काळी हे हॉस्पिटल पीपल्स को-ऑप. बँकेला 30 वर्षाच्या कराराने दिलेले आहे. तसेच जळगाव असलेल्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये एकही आयसीयू बेड नाही. यामुळे गोरगरीब जनतेची खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होऊन उपचारापासून वंचित राहत असताना दिसून येत आहे. या करारामधून जळगाव महापालिका व गोरगरीब जळगाववासीय जनतेला मात्र कुठलाच फायदा होताना दिसत नाहीये. म्हणून त्वरित हा करार रद्द करून शाहू महाराज हॉस्पिटल पीपीपी तत्वावर देण्याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात यावी, जेणेकरून शहरातील गोरगरीब व वंचित जनता उपचारापासून वंचित राहणार नाही. निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी महानगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे मजहर पठाण, स्वप्नील नेमाडे, तुषार इंगळे, कल्पेश भोईटे ,अक्षय वंजारी , रितेश पाटील ,प्रशांत राजपूत, तसेच अनेक युवा सहकारी उपस्थित होते.