Friday , February 22 2019

गूळ महागला ; दिवाळीपर्यंत दर तेजीत राहणार

मार्केट यार्डातील भुसार बाजारात आवक वाढली

पुणे : गौरी, गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गृहिणींनी घरातील जिन्नसांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत गुळाच्या मागणीतही वाढ झाली असून परिणामी घाऊक बाजारात गुळाच्या दरात प्रतिक्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळीच्या दरातही वाढ झाली असून गौरी, गणपती, दसरा आणि दिवाळीपर्यंत गुळाचे दर तेजीतच राहणार आहेत.

गुळाच्या मागणीत वाढ सुरू झाल्यामुळे पुढील दोन महिने गुळाचे दर तेजीत राहणार आहेत. सध्या मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुळाची आवक वाढली आहे. दौंड तालुक्यातील राहू पिंपळगाव, केडगाव, पाटस तसेच दौंडलगत गुर्‍हाळे आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर ही गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. तसेच मागणीत वाढ झाल्याने या भागातून होणारी गुळाची आवकही वाढली आहे, अशी माहिती भुसार बाजारातील एका व्यापार्‍याने दिली.

प्रतिक्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ

गौरी, गणपती, दसरा, दिवाळीत गुळाच्या मागणीत वाढ होते. त्याप्रमाणे किरकोळ विक्रेत्यांकडून गुळाची मागणी वाढली आहे. गुळाचे दर प्रतिक्विंटलमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. पुढील दोन महिने गुळाचे दर तेजीत राहतील. गेल्या काही दिवसांपासून सामान्य ग्राहकांकडून खोक्यातील गुळाला मागणी वाढली आहे. सामान्य ग्राहक छोट्या खोक्यांमधील गूळ विकत घेतात. गणपतीसाठी गुळाच्या मोदकाला चांगली मागणी असते. गुळाच्या मोदकाच्या प्रतिक्विंटलचे दर सात ते साडेसात हजार रुपये असल्याची माहिती व्यापार्‍याने दिली.

रसायनरहीत गुळाच्या मागणीत वाढ

गेल्या काही वर्षांत ग्राहकांकडून रसायनविरहीत गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या गुळाच्या निर्मितीसाठी रसायनांचा वापर केला जात नाही. रसायनविरहीत गुळाचे घाऊक बाजारात प्रतिक्विंटलचे दर 3700 ते 4500 रुपये आहेत. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार गुळाचे क्विंटलचे दर 2,950 ते 3,700 रुपये असे आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 40 ते 50 रुपये आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!