गोंधळ घालत महिलांचे मंगळसूत्र लांबवले

0

यावल बसस्थानकावर बर्‍हाणपूर-शिर्डी बस आल्यानंतर घडला प्रकार : पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी

यावल- बसमध्ये चढताना अज्ञात दोघा महिलांनी गोंधळ घालत दोन विवाहितांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तो पर्यंत चोरट्या महिला पसार झाल्या होत्या.

गोंधळ घालत लांबवले मंगळसूत्र
यावल बसस्थानकावर शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बर्‍हाणपूरकडून शिर्डीला जाणारी बस (क्रमांक एम.एच.14 बी.टी.1602) आल्यानंतर त्यात सुनंदा राजेश कापडे (रा.नाचणखेडा, जिल्हा बर्‍हाणपूर) व मीराबाई युवराज पाटील (रा.मोहराळे, ता.यावल) या चोपडा जाण्यासाठी बसमध्ये चढत असतानाच दरवाज्याजवळ उतरण्याच्या कारणाने दोघा अज्ञात महिलांनी गोंधळ घालत दोघाही विवाहितांच्या गळ्यातील चार ग्रॅमचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. याबाबतची माहिती कळताच पोलिस कर्मचारी असलम शेख आणि नितीन चव्हाण यांनी धाव घेत बसची तपासणी केली मात्र चोरट्या महिला तोपर्यंत पसार झाल्या. शुक्रवारी यावलचा आठवडे बाजार असल्याने चोरटे नेहमीच बसस्थानक वा बाजारात चोरी करीत असल्याने पोलिसांनी वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.