घरकुलमध्ये सुटतील सर्वच निर्दोष

0

भाजप गटनेते भगत बालाणी यांचा विश्‍वास; वैयक्तिक टीका अयोग्य

जळगाव :मनपात सत्ताधारी भाजप आणि विरोधक शिवसेना नगरसेवक पत्रकार परिषद घेवून आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. रविवारी शिवसेना नगरसेवकांनी वैयक्तिक टीका केल्यानंतर सोमवारी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी पत्रकार परिषद घेवून वैयक्तिक टीका योग्य नसल्याचे सांगितले. तसेच घरकुलमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्यासह सर्वच निर्दोष होतील असा विश्‍वास बालाणी यांनी व्यक्त केला.

मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन,बंटी जोशी,महानगरप्रमुख शरद तायडे यांनी वैयक्तिक टीका करु नये. शहराच्या विकासावर बोलावे असेही बालाणी म्हणाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मला 15 मिनिट अभ्यासपूर्ण सभागृहात बोलावे असे आव्हान दिले.मात्र आम्ही न बोलता विकासकामांवर भर देत असल्याचे सांगत माजी आमदार सुरेशदादा जैन,माजी महापौर प्रदीप रायसोनी हे सभागृहात न बोलता शहराच्या विकासाकडे लक्ष द्यायचे असे भगत बालाणी यांनी सांगितले. सभागृहात बोलल्यामुळेच एखादा लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष असतो हा शिवसेनेच्या नगरसेवकांचा गैरसमज असल्याचा सवाल बालाणी यांनी
उपस्थित केला.