घरकुल घोटाळ्यात अडकलेल्या पाच नगरसेवकांवरील कारवाई टळली

0

जळगाव । जळगाव नगरपालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले विद्यमान नगरसेवक सदाशिव ढेकळे, भगत बालाणी, कैलास सोनवणे, लता भोईटे व दत्तात्रय कोळी यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली आहे.

धुळे विशेष न्यायालयाने घरकुल घोटाळ्यातील आरोपी आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावली आहे. या आरोपींपैकी विद्यमान नगरसेवक सदाशिव ढेकळे, भगत बालाणी, कैलास सोनवणे, लता भोईटे व दत्तात्रय कोळी यांना अपात्र करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी मनपा आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर कामकाज कामकाज झाले. पण या प्रकरणात नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा अधिकार हा मनपा आयुक्तांना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा निकाल मनपा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे या नगरसेवकांवरील कारवाई टळली आहे.