घरातच बुध्द वंदना ग्रहण करा

0

जळगाव – देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत संभ्रम आहे. दरम्यान घरातच राहुन बुध्द वंदना ग्रहण करून जयंती साजरी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे.

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची दि. ११ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची दि. १४ रोजी जयंती आहे. या दोन्ही महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने जयंती साजरी करण्यावर निर्बंध आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी महामानवांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११.०० वाजता आपल्या कुटुंबासहित घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करून अर्थात सर्वानी ठरलेल्या एकाच वेळेत बुद्ध वंदना ग्रहण करावे असे आवाहन केले आहे. संपुर्ण देशात यादिवशी बुध्द वंदनेचा आवाज घुमेल व बुद्ध वंदनेने देशात एक शांतमय वातावरण निर्माण होईल. जगाला तारण्यासाठी युद्ध नको बुद्ध हवे असल्याचेही अरविंद मानकरी यांनी कळविले आहे.