घरातून बाहेर काढल्याने पतीची पत्नीला मारहाण

0

भोसरी ः प्रेमसंबधांतून लग्न केल्याने नवदाम्पत्यास कुटूंबीयांनी घराबाहेर काढले. त्याचा राग मनात धरून पतीने पत्नीलाच मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली. भोसरी येथे गणेश भाजी मंडईजवळ नुकताच हा प्रकार घडला. 25 वर्षीय नवविवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यातून त्यांनी 3 जानेवारी रोजी नोंदणीकृत पद्धतीने लग्न केले. पतीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी नवदाम्पत्याला घराबाहेर काढले. पतीच्या मनात याचा राग होता. त्यातून आरोपी पतीने आपल्या पत्नीलाच काठीने मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.