घुसखोरीला लागणार लगाम; नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन यादी प्रसिद्ध

0

आसाम-शेजारील देशांमधून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करुन येथेच वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांची संख्या मोठी आहे. ही देशाच्या सुरक्षेसह इतर कारणांसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर या घुसखोरांसाठी सर्वात सोयीचे ठिकाण असलेल्या आसाममध्ये किती घुसखोरांनी प्रवेश केला आहे याची माहिती देणारे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन आज प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार, एकूण ३.२९ कोटी अर्जांमधून २.८९ कोटी लोकांचे नावे या राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

४० लाख लोकांची नावे यातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आसाममध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. मात्र, ही केवळ प्राथमिक यादी असून अंतिम अहवाल नसल्याने काही जणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत भारतातील अधिकृत नागरिकांच्या नाव, फोटो, पत्यासह माहिती दिलेली असते. आसाममध्ये या राज्यातील अधिकृत भारतीय नागरिकांची माहिती असलेली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांची नावे, पत्ते आणि फोटोंचा समावेश आहे.