घोडजामणे गावाजवळील तवेराच्या अपघातात मालेगावचे 10 जण जखमी

0 2

जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
नवापूर :
मालेगावहून हजीराकडे जाणार्‍या तवेरा गाडीचा नवापूर तालुक्यातील घोडजामणे गावाजवळ शनिवारी, 25 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात मुस्लिम समाजातील दहा प्रवासी जखमी झाले आहे. तवेरा गाडीने जोरदार झाडावर आदळल्याने 10 प्रवासी गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याची स्थिती गंभीर झाली होती. परंतु, 108 रूग्णवाहिकेच्या टिमच्या सतर्कतेने 10 प्रवाश्यांचे प्राण वाचले.

मालेगाव येथील काही भाविक सुरतजवळील हाजीरा येथे जात होते. पहाटे चार वाजता घोडजामनेनजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने त्याने वाहन थेट रस्त्याच्या खाली झाडाला ठोकले. या घटनेची माहिती मिळताच डॉ. राहुल सोनवणे, पायलट लाजरस गावित यांनी अवघ्या दहा मिनिटांच्या आता रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचली. वेळेवर अपघात झालेल्या रूग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून आले. डॉ.भानुदास गावित, डॉ. राहुल सोनवणे, परिचारिका रूपाली चौरे यांनी उपचार केले.

अपघातातील जखमींमध्ये मोहम्मद मोसिम मोहम्मद हसन (35), मोहम्मद परवेज (28), अनवर खान इस्माईल खान(40), मोहम्मद कासीम इब्राहिम शेख(28), मिर्झा अली अजगर मिर्झा मासूमबेग (65), उभेद मोहम्मद हारूण शेख (24), शेख तरिख शेख युनूस(38), मोहम्मद रफिक मोहम्मद यासिम (40, सर्व रा.मालेगाव जि. नाशिक) यांचा समावेश आहे.