‘गोली मारना बंद करो, देश तोडना बंद करो’; लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी !

0

नवी दिल्ली: संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सोमवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज सभागृह सुरु होताच एनआरसी आणि सीएए कायद्याच्या निषेधार्थ कॉंग्रेससह विरोधकांनी गदारोळ केला. सीएए कायदा हा देशविरोधी असल्याचे आरोप करत विरोधकांनी मोदींविरोधात घोषणाबाजी केली. ‘गोली मारना बंद करो, देश तोडना बंद करो’ अशी घोषणा विरोधकांनी केली. काही वेळासाठी विरोधकांनी सभागृह देखील सोडले होते.