Friday , February 22 2019

चंद्राबाबूंनी स्वत:च्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला-मोदी

अमरावती: २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभा घेत आहे. मोदींनी आज आंध्र प्रदेशमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्राबाबूंनी सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका मोदींनी केली आहे. चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपा आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशाने कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, अशी टीकाही मोदींनी केली.

आमच्या सरकारच्या काळात आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच मदत मिळाली. आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्राने दिलेल्या पॅकेजचा आंध्र सरकारने योग्य वापर केला नाही. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं नंतर यू-टर्न घेतला, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. आमचा उद्देश स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी धन निर्माण करण्याचा आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!