चहार्डी खूनप्रकरण ; दुसर्‍या दिवशीही नाही गवसला मृतदेह

0

चोपडा- तालुक्यातील चहार्डी येथील 12 वर्षीय बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आईसह दोन संशयीतांनी खून करीत काटा काढून मृतदेह खदानीत टाकला होता. मंगळवारनंतर बुधवारीही दिवसभर एनडीआरएफच्या टीमने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळनंतरही मृतदेह हाती लागला नाही त्यामुळे गुरुवारी पुन्हा सकाळपासून शोध मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने मुलाचाच केला खून
चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील (12) हा बालकाचे सुरुवातीला गुप्तधनासाठी अपहरण करून खून केल्याची चर्चा रंगली होती शिवाय पोलिसांचा तपासही त्यादृष्टीने सुरू होता मात्र चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी गोकुळ सोनवणे यांना गोपनीय माहिती काढण्यासाठी पाठवल्यानंतर अनैतिक संबंधात हा चिमुकला अडथळा ठरल्याने त्याचा काटा काढण्यात आल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर मयत विद्यार्थ्याच्या आईसह तिघांच्या मुसक्या सोमवारी आवळण्यात आल्या होत्या.

अनैतिक संबंध उघड न होण्यासाठी केला खून
चहार्डीचा मंगेश पाटील हा विद्यार्थी 2 रोजी शौचाला गेल्यानंतर घरी आला असता आईला नको त्या अवस्थेत त्याने परपुरूषासोबत पाहिले होते व हे संबंध वडिलांना सांगितल्याची त्याने धमकी दिल्याने बदनामी न होण्यासाठी आरोपी राजेंद्र पंढरीनाथ पाटीलने मंगेशच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने तो मयत झाला तर आई गीताबाईसह भाचा समाधान उर्फ संभा विलास पाटील व राजेंद्र पाटील यांनी घटनेच्या दिवशी रात्री मंगेशचा पाय कोयत्याने कापत तो काटेरी झुडुपात फेकून रक्ताने माखलेले कपडेही तिथे फेकले व नंतर मृतदेह खदानीत टाकला होता. सुरुवातीला मंगेशचा नरबळीच्या उद्देशाने बळी गेल्याची चर्चा होती मात्र 24 दिवसांच्या सखोल तपासानंतर अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचे उघडकीस आले होते.

48 तासानंतरही आले नाही यश
मंगळवारी धुळे येथील एनडीआरएफच्या दलाने चहार्डी येथील खदाणीत शोध मोहीम राबवली मात्र यश न आल्याने बुधवारी सकाळपासून मोहिम राबवण्यात आली मात्र त्यानंतरही मृतदेह गवसला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.