चांगा आला लोटांगणी, लोळे मुक्ताई चरणी

0

महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताईचे लाखो वारकर्‍यांनी घेतले दर्शन

मुक्ताईनगर-
चांगा आला लोटांगणी, लोळे मुक्ताई चरणी
चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरूपुत्र झालो मुक्ताईचा

श्री संत मुक्ताई-चांगदेव या गुरू-शिष्य भेटीचा अनोखा सोहळा विजया एकादशी व महाशिवरात्रीनिमित्त दुर्मीळ योग सोमवारी जुळून आला. यानिमित्त लाखो भाविकांनी स्नान करीत संत मुक्ताईसह चांगदेव मंदिरात दर्शनही घेतले. संत मुक्ताईच्या दर्शणाची ओढ घेवून आलेल्या खान्देशातील शेकडो दिंडीतील भाविकांनी विजया एकादशीच्या द्वादशीला दर्शन घेवून महाशिवरात्रीला पायी वारीची प्रसंगी सांगताही केली.

लाखो भाविकांनी घेतले दर्शन
महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील पूर्णा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या चांगदेव येथे गुरू-शिष्य भेटीचा सोमवारी अनोखा सोहळा पार पडला. याप्रसंगी लाखो वारकर्‍यांनी चांगदेवाचे तसेच सिद्धेश्वर महादेवाचेही दर्शन घेतले. संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, तहसीलदार शाम वाडकर, सरपंच संजीवनी पाटील, पोलिस पाटील पल्लवी चौधरी, माजी सरपंच पंकज कोळी यांनी पूजा व अभिषेक केला त्यानंतर संत मुक्ताई संस्थांच्या आलेला मुक्ताई पालखीने चांगदेवाची भेट घेत मुक्ताईनगरकडे पुन्हा मार्गस्थ झाली.

लाखो भाविकांनी घेतले दर्शन
श्री चांगदेव मंदिराला हजोरा वर्षांपूवीचा इतिहास आहे. चांगदेव महाराजांनी तपश्चर्या करुण सिद्देश्वर महादेवाच्या पिंडीची स्थापना केली तर चांगदेव महाराजांच्या मंदिरासमोरच सिद्देश्वर महादेवाचे मंदिर आहे. हजारो वर्ष मृत्यूला चुकविणार्‍या चांगदेवांना ज्ञानेश्वरादी भावंडांनी उपदेश करीत संत मुक्ताबाई यांनी गुरू उपदेश केला होता. विजया एकादशीमच्या मुहूर्तावर चांगदेवाने संत मुक्ताईने अनुग्रह दिल्याने या दिवशी गुरू-शिष्य भेटीचा सोहळा साजरा केला जातो. संत मुक्ताईच्या दर्शणाची ओढ घेवून आलेल्या शेकडो दिंड्या संत मुक्ताईचे दर्शन घेवून
महाशिवरात्रीला पायी वारीची सांगता करतात. यात्रोत्सवानिमित्त मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शणाखाली पोलीस कर्मचारी होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त राखला. याप्रसंगी भाविकांना फराळासह दुधाचे वाटप करण्यात आले.