Friday , February 22 2019

चाकणमध्ये जेष्ठाची गळफास घेऊन आत्महत्या 

चाकण : पत्नीच्या मृत्युचे दुखः सहन न झाल्याने 59 वर्षीय जेष्ठ इसमाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयफेल सिटी (राणूबाईमळा, चाकण, ता. खेड) येथे घडली आहे. शनिवारी (दि.9) या बाबतची माहिती चाकण पोलिसांनी दिली.
अनिलकुमार रमणिकलाल दावडा (सध्या रा. राणूबाई मळा, चाकण) असे आत्महत्या केलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्याचा मुलगा सुमित अनिलकुमार दावडा ( वय 37) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुमित दावडा यांनी पोलिसांत दिलेल्या माहिती नुसार सुमित यांच्या आईचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेंव्हापासून वडील अनिलकुमार दावडा हे मानसिक तणावाखाली होते. त्यातून त्यांनी राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बारावीचा पहिला पेपर शांततेत !

शहरातील 27 केंद्रावर परीक्षा सुरु पिंपरी चिंचवड: शहरात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!