चार दिवसात एक हजार बेडची व्यवस्था करणार: आरोग्यमंत्र्यांची माहिती

0

मुंबई: कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतात मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. महाराष्ट्रात ७५ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे ही संख्या मोठी आहे. दरम्यान आज महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत खबरदारीचे सर्व उपाय सरकारने केले असून नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांवर विशेष उपचार केले जाणार आहे, त्यासाठी चार ते पाच दिवसात एक हजार बेडची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद येथे कोरोनाची तपासणी करण्यासाठी लॅब उभारण्याची घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी केली.

सात देशांमधून परतणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोनाबद्दल अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.