चाळीसगावात कुलरचा शॉक लागल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू!

चाळीसगाव – घराबाहेर असलेला पत्र्याच्या कुलरला खेळताना दोन चिमुकल्यांचा शॉक लागून त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज शहरातील मेहतर कॉलनी येथे घडली असून एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राणु विकी गोयल (वय- ३ वर्ष) व रोहन राकेश गोयल (वय- ३ वर्ष) रा. मेहतर कॉलणी ता. चाळीसगाव दोघेही घरासमोर खेळत होते. दरम्यान पत्र्याचा कुलर बाहेर चालू असताना अचानक कुलरचा शॉक बसला व त्यातच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. हि घटना दुपारी १२:३० च्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने वडील विकी गोयल व राकेश गोयल दोघेही खासगी दवाखान्यात साफसफाईचे काम करतात. गोयल कुटूंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.