चाळीसगावात महिला आरोग्य सुदुढता पंधरवडा शिबिरास प्रारंभ

0

चाळीसगाव- कुटुंब व समाजाचा आधार असलेली स्त्री विविध जबाबदा-या पार पाडतांना नेहमीच स्वत:च्या आजाराकडे दुर्लक्ष करते परंतू वेळ निघून गेल्यावर हाच आजार जीवघेणा ठरतो.हे लक्षात घेवून खास महिलांसाठी आरोग्य सुदृढता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.कर्करोगाविषयी समज आणि गैरसमज याबाबत मार्गदर्शन व तीस वयोगटावरील प्रत्येक महिलेने तीन ते पाच वर्षातून एकदा पँप्सस्मिअर टेस्ट करणे अत्याआवश्यक असल्याची अपेक्षा स्त्री रोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. चाळीसगाव स्त्री रोग संघटना आयोजित स्त्री चैतन्य हॉस्पिटल येथे महिला आरोग्य सुदृढता या विषयावर आयोजित पेप्सस्मिअर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सुमारे पंधरा दिवस चालणार्‍या शिबीराप्रसंगी स्त्री रोग प्रसूतीशास्त्र तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.यावेळी शहरातील हिरकणी महिला मंडळाच्या सुमारे पंधरा सदस्यांनी तपासणी शिबीरात सहभाग नोंदविला. पंधरवाडा शिबीरात स्त्री रोग प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ.उज्वला देवरे,डॉ.नयना चव्हाण,डॉ.निलांबरी तेंडुलकर,डॉ.राहुल साळुंखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध वैद्यकिय तपासण्यांच्या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखावरील कँन्सरची पँप्सस्मिअर टेस्टची तपासणी करण्यात येत असून शुभारंभ पासून शिबीरास महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे. 15 मार्च ते 30 मार्च अखेरपर्यंत सुरु असलेल्या पंधरवडा आयोजित शिबीराचे नाममात्र शुल्क आकारण्यात आले असून गरजू महिलांनी शहरातील स्त्री चैतन्य हॉस्पिटल,तेंडुलकर हॉस्पिटल,देवरे हॉस्पिटल,गिरणा हॉस्पिटल या ठिकाणी आपली नाव नोंदणी करुन महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्त्री रोग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे

यांची होती उपस्थिती
यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, भडगाव पं.स.माजी सभापती गीता पाटील,प्रीती रघुवंशी,वैष्णवी पाटील,योगिता पाटील,शैला पवार,छाया राजपूत,मनीषा बोरसे,मिनोती पवार,अनिता शर्मा,शांता पाटील आदी महिलांनी तपासणी शिबीराचा लाभ घेतला.