चाळीसगावात शिवसेना करणार नाही भाजपाचा प्रचार

0

चाळीसगाव : लोकसभेच्या निवडणुकीत चाळीसगाव शिवसेना भाजपचा प्रचार करणार नाही, असा एकमुखी एल्गार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रपरिषदेत केला.

गेल्या 30 वर्षात भाजपच्या विद्यमान खासदारांनी मतदारसंघ कलंकित होईल असेच वर्तन केले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस शिवसेना कार्यकर्त्यांची भाजपला आठवण होते. मात्र त्यानंतर शिवसेनेचा भाजपला विसर पडतो. यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा म्हणून माजी आ. आर. ओ. तात्या पाटील यांच्या माध्यमातून पक्षाने मतदारसंघ पिंजून काढला आहे. ही जागा शिवसेनेने लढवावी यासाठी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. येत्या निवडणुकीत आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही असा एकमुखी एल्गार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रपरिषदेत केला. शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत, माजी नगरसेवक बबलू बाविस्कर,शिवसेनेचे तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे उपशहरप्रमुख निलेश गायके, तालुका संघटक भावडू गायकवाड, राजेंद्र कुमावत, गोकुळ परदेशी, मनोज कुमावत आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.