चाळीसगावात सेंट जोसेफ स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश

0

चाळीसगाव- समाजात तंबाखुच्या व्यसनाने विळखा घातला आहे मोठीच नाही तर लहान मुले ही गुटख्याच्या आहारी जात असल्याने भविष्यात वाईट परिणाम येणार्‍या तरुण पिढीला भोगावी लागणार आहेत यावर जनजागृती करण्यासाठी नववीच्या मुलांनी अतिशय आशयपूर्ण प्रभावी पथनाट्य सादर केले शहरात दोन ठिकाणी सिग्नल पॉइंट आणि बाजार समिती आवारात पथनाट्य सादर केले.

शहरात पथनाटय सादर करुन नागरिकांमध्ये केली जनजागृती
आजच्या युगात कामाला असणारा भरमसाठ व्याप आणि येणार्‍या एकटेपणा स्वप्नांच्या आधारे दूर करण्याची सवय आजकाल कित्येकांना लागलेली दिसते.आजच्या पिढीतील कित्येकजण व्यसनेच्या अधीन गेले आहेत.नातेसंबंध जबाबदारी आणि वाढत्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे हि पिढी व्यसनाधीन झाली आहे.पथनाट्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या प्रश्नांविषयी समाजात जनजागृती,मुलांना समुपदेशन व त्यांच्यातील कलागुणांना पारखून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे,पथनाटयाच्या माध्यमातून बालपण वाचवा,व्यसनापासून मुक्त व्हा,धुम्रपानास प्रतिबंध तसेच व्यसनमुक्तीसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर जनजागृती व प्रबोधन करण्यात आले.व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी चांगले विचार व संस्कार यांची शालेय जीवनापासून आवश्यकता असल्याचे पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी सादर केले.

यांनी केली जनजागृती
सार्थ पाटील, मृणाल बिरारी, आर्यन जैन, आकांक्षा वाघ, साक्षी रावलानी, आयुशी जैन आदी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी प्राचार्या सिस्टर लिजी,युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव,आय एम ए च्या माजी अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे,शैला छाजेड वाहतूक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ,जलसाक्षर दूत स्वप्नील कोतकर,रवींद्र छाजेड सुदर्शन राठोड,श्रीकांत कुलकर्णी,पुनम वाघमारे,सागर मोरे चौधरी सर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.