चाळीसगावात 44 लाखांचा गांजा पकडला ; तिघांना अटक

0 3

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ; चाळीसगावसह भुसावळातील आरोपी

चाळीसगाव- शहराजवळील ओझर येथे मोठ्या प्रमाणावर गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत शनिवारी सकाळी तिघांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 593 किलो वजनाचा व 44 लाख 47 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला तर घटनास्थळावरून इनोव्हा व महेंद्रा कारही जप्त करण्यात आली आहे. एकूण मुद्देमालाची किंमत 70 लाख 70 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात आले. गांजा तस्करी प्रकरणी शुभम किरण राणा (22, मराठा मंगल कार्यालयासमोर, चाळीसगाव), भूषण केशव पवार (32, दाळवाली खळे, चामुंडा मामा मंदिराजवळ, चाळीसगाव) व रवींद्र गुलाबराव शिंदे (53, जुना सातारा, कडू प्लॉट, भुसावळ) यांना अटक करण्यात आली.

गुप्त माहितीवरून कारवाई
चाळीसगावजवळील ओझर बसस्थानकाजवळ गांजा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, एपीआय महेश जानकर, रवींद्र बागुल, एएसआय मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, रामचंद्र बोरसे, महेश पाटील, रामकृष्ण पाटील, इद्रीस पठाण, अशरफ शेख, संजय सपकाळे, दत्तात्रय बडुजर, किरण चौधरी, विनयकुमार देसले, योगेश वराडे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपींनी हा गांजा आंध्रातून आणल्याचे समजते.