चाळीसगाव पोलिस उपअधीक्षकपदी उत्तम कडलग

0

सहाय्यक पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश

भुसावळ- राज्यातील सहा पोलिस उपअधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले. चाळीसगावचे पोलिस उपअधीक्षक नजीर शेख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक ग्रामीणचे उत्तम दामोदर कडलग बदलून येत आहेत. दरम्यान, चाळीसगावचे नजीर शेख यांची सुरुवातीला औरंगाबाद ग्रामीण तर फैजपूरचे राजेंद्र रायसिंग यांची सिल्लोड येथे बदली झाली असलीतरी त्यांच्या जागी अन्य अधिकार्‍यांची नियुक्ती झाल्याने या दोघा अधिकार्‍यांना लवकरच अन्य ठिकाणी नियुक्ती दिली जाणार असल्याचे संकेत आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
नाशिक ग्रामीणचे उत्तम कडलग यांची चाळीसगाव उपअधीक्षकपदी, नागपूर ग्रामीणच्या रीना जनबंधू यांची भंडार उपविभाग उपअधीक्षकपदी, करवीर उपविभागाच्या प्रेरणा कट्टे यांची कोल्हापूर शहर उपविभागाच्या उपअधीक्षकपदी, कोल्हापूर शहर उपविभागाचे प्रशांत अमृतकर यांची कोल्हापूर करवीर उपविभागात उपअधीक्षकपदी, बीड अष्ट उपविभागाचे विशाल नेहुल यांची औरंगाबाद ग्रामीण उपअधीक्षकपदी, कर्जत उपविभागाचे सुदर्शन मुंडे यांची सिल्लोड उपविभागाच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली.