Tuesday , March 19 2019

चाळीसगाव शहरात 127 कोटींच्या भुयारी गटारी लवकरच

चाळीसगाव- दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढते आहे त्याच बरोबर शहराचा भोगोलीक विस्तार ही वाढतो आहे शहरात उघड्या गटारीमुळे आरोग्याच्या व स्वच्छतेची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 127 कोटींची भुयारी गटारी योजनेला मंजुरी दिली असून आज पालिका सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी व नगरसेवकांच्या उपस्थितीत या योजनेचे सादरीकरण करण्यात आले.

कशी आहे भुयारी योजना
चाळीसगाव नगरपरिषद ही ब वर्गात मोडते 2011 च्या जनगणने नुसार शहराची लोकसंख्या 97551 इतकी आहे शहरात सतरा प्रभाग आहेत शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ही गिरणा धरणावरून टाकण्यात आली आहे आधीच्या जलवाहिनी ला 72 कोटींची समांतर पाणीपुरवठा योजना यापूर्वीच मंजूर झाली असून तिची निविदा प्रक्रिया सुरू आहे मात्र शहरात उघड्या गटारीतून वाहणार्‍या दुर्गंधी युक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो . घाणी पासून होणारे डेंगू ,मलेरिया सारख्या साथीच्या रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागते यापासून शहराला मुक्ती मिळावी यासाठी पालिका प्रशासनाने प्राधान्यक्रमाने भुयारी गटारी या योजनेचा पाठपुरावा केला होता लवकरच या भुयारी गटारी शहरात होतील यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये
प्रस्तावित योजना ही शहरात पुढील तीस वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येला गृहीत धरून करण्यात आली आहे घरगुती मागणीसह शहरातील शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायीक इतर सर्व संस्थांची मलनिस्सारण सांड पाण्याची व्यवस्था या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे
या गटारीसाठी अंदाजे एक फूट ते चार फुटापर्यंतचा पाईप वापरण्यात येणार आहे ,तर मलजल वाहिनी साठी उच्च दर्जाच्या आर सी सी पाईप प्रस्तावित केलेले आहेत प्रत्येक प्रभागनिहाय लोकसंख्या विचारात घेऊन सांडपाण्याची गणना केली आहे त्यादृष्टीने गांडूळ खत प्रकल्पाजवळ असलेल्या कचरा डेपो जवळ 19.0एम एल डी चा मलनिस्सारण शुद्धीकरण केंद्र अर्थात एसटीपी सेंटर प्रस्तावित आहे.

असा आहे प्रस्तावित प्रकल्प
शहरातील रेलवे रुळांच्या खालून व मुख्य रस्त्यांखालून पाईपलाईन टाकताना पुश थ्रोग पद्धतीने केली जाणार आहे अत्याधुनिक मलनिस्सारण प्रकल्पा पर्यत जाण्यासाठी डांबरी रस्ते देखील तयार केले जाणार आहे या जल निस्सारण स्टेशन जवळ कर्मचारी निवासस्थान ,संरक्षक भिंत, विद्युतीकरण ,केंद्राचा स्वच्छ प्रांगण होईल. शहर स्वच्छ व दुर्गंधी मुक्त रहावे यासाठी ही योजना महत्वकांक्षी ठरणार आहे.

शहरवासीयांसाठी अभिमानाची योजना – नगराध्यक्षा आशालता चव्हाण
वाढत्या शहराच्या विकासासाठी एकशे सत्तावीस कोटींची भुयारी गटार योजना लवकरच कार्यान्वित होईल आज या योजनेचे पालिका सभागृहात नगरसेवकासमोर सादरीकरण झाले भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक व गरजेची असून सर्व नगरसेवक व शहरवासीयांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी जनशक्ती शी बोलताना दिली

सादरीकरणातून प्रकल्पाची ओळख -मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर
शहरात भुयारी गटार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे यश इंजिनियरींग औरंगाबाद यांनी डीपीआर तयार केला आहे ही योजना कशी कार्यान्वित होईल याचे प्रेझेंटेशन नगरसेवकांना दाखविण्यात आले .चाळीसगाव शहर रोगराई मुक्त करण्यासाठी भुयारी गटार योजनेची आवश्यकता आहे अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
पालिका सभागृहात सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी , भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील ,संजय पाटील ,नितीन पाटील ,मानसिंग राजपूत ,चिरागोद्दीन शेख, चंद्रकांत तायडे, अरुण आहिरे, विजया प्रकाश पवार,विजयाताई भिकन पवार, वस्तलाबाई महाले , रंजनाबाई सोनवणे,संगीता गवळी, झेलाबाई पाटील , वैशाली मोरे, तसेच पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटील , बांधकाम अभियंता दिगंबर वाघ ,अभियंता विजय पाटील ,अतिक्रमण अधिकारी भूषण लाटे ,विजय खरात, संजय राजपूत यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

होमगार्डचा प्रामाणिकपणा ; सापडलेली पैशांची पिशवी दिली पोलीस ठाण्यात

जळगाव : एकीकडे जिल्ह्यात तसेच शहरात पैशांची दरोडा, चोरीच्या घटना समोर येत आहे. तर दुसरीकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!