चिंचवडमध्ये सराफी दुकान फोडले

0

पिंपरी चिंचवड ः चिंचवड येथे सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार आज (सोमवारी), दि. 20 रोजी सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी माहिती दिली. बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकात बालाजी ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदाराकडून नेमका आकडा न सांगितल्यामुळे चोरीला गेलेला ऐवज कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.