चिंचवड येथील साईबाबा मंदिरात चोरी

0

चिंचवड ः चोरट्याने बंद मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून मंदिरात प्रवेश करत दानपेटीसहीत त्यातील 20 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवार (दि. 16) रात्री उशीरा 12 च्या दरम्यान संभाजीनगर चिंचवड येथी साई गार्डन साईबाबा मंदिरात घडली.

याप्रकरणी सतिश बाबूराव सराटकर (वय 64 रा. संभाजीनगर रूम नं. 18/1 सम्राट सोसा. चिंचवड) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 12 च्या दरम्यान मंदिराचा दरवाजा कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उटकटून मंदिरात प्रवेश केला. तसेच मंदिरातील दानपेटी चोरून मंदिराच्या मागच्या बाजूस नेली. तेथे ती पेटी फोडली आणि त्यातील जवळपास 20 हजारांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.