चिंचोलीच्या विवाहितेचे अपहरण ; 10 जणांविरुद्ध गुन्हा

0 1

यावल- आंतरजातीय विवाह केल्याचा रागातून नवविवाहित तरुणीच्या सासरी (चिंचोली ता. यावल) येवुन तिच्या नातलगांनी तिला मारहाण केली व तिला जबरदस्तीने एका वाहनातून पळवून नेले व तिला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून दहा जणांविरूद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचोली येथील पायल अनिल सोळुंके (20) या तरुण विवाहितेच्या फिर्यादीनुसार 18 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तिचे नातलग राज रवींद्र पारधी, कल्पनाबाई रविंद्र पारधी, देवकाबाई रघुनाथ पारधी, निर्मलाबाई जवाहरलाल चव्हाण, चंदाबाई विजय पारधी, शोभाबाई पारधी (सर्व राहणार पिंप्री, ता.अमळनेर) तसेच छायाबाई साहेबराव पवार, महेंद्र साहेबराव पवार, राजेंद्र साहेबराव पवार व आकाश रवींद्र पारधी (सर्व रा.धरणगाव) यांनी चिंचोली येथे तिच्या सासरी येवुन तीला व तिच्या सासूला धक्काबुक्की करीत मारहाण केली. जबरदस्ती चारचाकी (एम.एच. 18 – 793) या चार चाकी वाहन डांबले व तिथून तिला धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे नेले. सोनगीरला एका ब्राम्हणाकडे नेल्यानंतर पायलने आरडा-ओरड केल्यानेे तिला तेथुन वरील सर्व संबधीत 10 संशयीत चोपडा येथे तिच्या आई-वडिलांच्या कडे घेऊन आलेे. 27 फेब्रुवारी रोजी अनिल सोळुंके या तरूणाशी पायलने आंतरजातीय विवाह केला व ती पारधी समाजाची असल्याने तिने कोळी समाजाच्या तरूणाशी केलेल्या अंतरजातीय विवाहाचा राग येऊन आरोपींनी हा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहेत.