चिदंबरम पिता-पुत्राला दिलासा !

0

नवी दिल्ली – एअरसेल-मॅक्सीस मनी लॉन्डरिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने अंतरिम जामिनाची मुदत ७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. एअरसेल मॅक्सीस मनी लॉन्डरिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी.चिदबंरम यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळात अधिकारांचा गैरवापर करून मुलगा कार्ती याला थेट लाभ मिळवून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.