चुंचाळ्यात उद्या गुुरुपौर्णिमेनिमित्त पालखी मिरवणूक

0

चुंचाळे – श्री समर्थ सुकनाथ बाबा व श्री समर्थ रघुनाथ बाबा यांची जन्मभुमी व श्री समर्थ वासुदेव बाबा याची कर्मभुमी असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हजारो भाविक येथे सुकनाथ बाबा रघुनाथ बाबा व श्री समर्थ सतगुरु वासुदेव बाबा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येतात. चुंचाळेसह परीसरातील वासुदेव बाबा यांचे शिष्यगण गुरू शिष्यामधील नाते अखंडीत रहावे या हेतुने गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. शुक्रवारी सायंकाळी संपूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दहीहंडीचा कार्यक्रमही होणार आहे.

दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम
शुक्रवारी पहाटे पाचला मूर्ती स्नान, सहाला मारोती अभिषेक, दुपारी बाराला महाआरती, संध्याकाळी सातला आरती तर दिवसभर भजने व भारुडे सुरू राहणार आहेत. दुपारी एक वाजेपासुन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल, असे वासुदेव बाबा भक्त गण व वासुदेव बाबा भजनी मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.