चोरवड नाक्यावर चार हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

0

भुसावळ- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व तालुक्यात पोलिसांकडून नाकाबंदी मोहिम राबवली जात असून शुक्रवारी तालुका पोलिस ठाणे हद्दीत चोरवड नाक्यावर राबविण्यात आलेल्या मोहिमेत 11 वाहन धारकांकडून दोन हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याप्रसंगी 44 वाहनांची तपासणी करण्यात आली तर चोरवड नाक्याजवळील के.के.हॉटेलजवळ पोलिसांनी छापा टाकत चार हजार 162 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली. संशयीतअ आरोपी सुरेश जगन्नाथ नाफडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.