‘चौकीदार चोर है’ या विधानाचे स्पष्टीकरण द्या; राहुल गांधींना कोर्टाचे आदेश !

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी ‘चौकीदार चोर है’ हे कॅम्पेन काँग्रेसतर्फे चालवण्यात येत आहे. पण या विधानामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ‘चौकीदार चोर है’ या विधानाचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याकडे मागितले आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखींच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. राफेल करारात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधानांचा पुढाकार होता. हे सर्व नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.

‘चौकीदार ही चोर है’ असे वक्तव्य त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले होते. तेव्हा या वाक्यावर इतका गदारोळ झाला नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘मै भी चौकीदार’ हे कॅम्पेन सुरु केले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या एका विधानाचा आधार घेत राहुल यांनी हे वक्तव्य केले होते. पण त्यामुळे सर्वौच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचे म्हटले जात आहे. ‘चौकीदार चोर है’ हे विधान सर्वोच्च न्यायालयाने केले नसल्याचे सांगत याबद्दस स्पष्टीकरण मागितले आहे. आता राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है या विधानाचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे.