छेड काढणार्‍यास 6 महिन्याचा कारावास

0

अमळनेर न्यायालयाचा निकाल, पाडसे येथील घटना
अमळनेर- तालुक्यातील पाडसे येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून वारंवार त्रास देणार्‍यास आज येथील जिल्हा व अति सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. 7 जुलै 2014 रोजीची ही घटना असून कांतीलाल दिलीप पवार (वय-27) असे आरोपीचे नाव आहे.

तिघांच्या साक्ष तपासल्या
कांतीलाल पवार याने एप्रिल 2014 मध्ये पीडित तरूणीला अश्‍लील शब्दाचा वापर करून तिचा हात पकडला पीडितेने त्याच्या हाताला झटका देऊन तेथून पळ काढला. त्या घटने नंतरही आरोपीने तिचा सतत 4-5 दिवस मागावर राहून 7 जुलै 2014 रोजी तिला अश्‍लील लिखाण करून पीडित मुलीच्या शाळेतील एका मुला मार्फत तिला एक चिट्ठी दिली. ती पीडितेने वाचून फाडून फेकून दिली व घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. यावरून 8 रोजी पीडित मुलगी,आई,वडील यांनी मारवड पोलिसात आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा फौजदार रामा वसतकर व तत्कालीन हवालदार शालिक कुंभार यांनी केला.या खटल्यात पीडित मुलीला दिलेली चिट्ठीचे तुकडे पंचनामा करून गोळा करण्यात आले व आरोपीचे हस्ताक्षराचे नमुने घेऊन फेकलेल्या चिट्ठीच्या तुकड्यांचे हस्ताक्षर हे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले.याकामी हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल ,पीडित मुलगी व ज्या मुलामार्फत पीडितेस चिट्ठी देण्यात आली होती त्या तिघांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. यावरून आरोपीस जिल्हा व अति सत्र न्या आर पी पांडे यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत भा द वि कलम 354(अ),बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा चे कलम 11 व 12 नुसार 6 महिने कारावास व 2000 हजार रु दंड दंड न भरल्यास 1 महिन्याचा कारावास देण्यात आला आहे. या कामी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड शशिकांत पाटील यांनी काम बघितले सोबर पैरवी अधिकारी सहा फौ अशोक पाटील यांनी मदत केली.