छोट्यातील छोटी मदतही स्वीकारणार; मोदींचे आवाहन

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला पुन्हा एकदा साद घातली आहे. कोरोनामुळे देशापुढे उभ्या ठाकलेल्या संकटावर मात करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जनतेने पीएम-केअर्स फंडात आपले योगदान द्यावे. या फंडात छोट्यातील छोटे योगदानही स्वीकारण्यात येईल. या निधीचा उपयोग पुढील काळातील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठीही करता येणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.