जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट

0

साफसफाई मक्त्यात गैरव्यवहार ; चौकशी करण्याची उपमहापौरांची मागणी

जळगाव– शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे. मात्र या मक्याचे काम असमाधानकारक असून मक्तेदाराने करारनाम्यातील अटी शर्तीची उल्लंघन केलेले असतानाही मक्तेदारावर कोणतीही कारवाई केली जात नाही.मक्तेदार आणि अधिकारी यांची मिलिभगत असल्यामुळे जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट होत आहे. त्यामुळे साफसफाईच्या मक्त्यात गैरव्यवहार होत असून चौकशी करावी अशी मागणी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम मनपा कर्मचार्‍यांकडून होत असतानाही त्या कामाच्या तुलनेत अवाढव्य मोबदल्याची बिले मक्तेदाराकडून सादर केली जात आहेत. संकलित कचर्‍यात दगड, माती, झाडाच्या फांद्या, वेस्ट मटेरीअल इत्यादी भेसळ करुन वजन वाढविण्यात येत असल्याचा भाग उजेडात आणण्यात आलेला आहे.तसेच मक्तेदाराकडे सोपवण्यात आलेल्या मनपा वाहनांच्या देखभालीकडेही मक्तेदाराचे दुर्लक्ष होत आहे.

मात्र तरीही मक्तेदाराविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न करता, सर्रासपणे बीले अदायगी केली जात आहे. जनतेतून कर रुपाने गोळा होणार्‍या लुट असल्याचा आरोप उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी केला आहे. मक्तेदाराने कामात कुचराई कल्यामुळे, संबंधित स्वच्छता निरिक्षकांनी वेळोवेळी आकारलेल्या दंडाची वसुली देखील पूर्णपणे केलेली नाही. महानगरपालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि मक्तेदार यांच्यात मिलीभगत असून यात मोठया प्रमाणावरील आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याच्या संशय आहे. च्यामुळे सखोल चौकशी करावी अशी मागणी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी केली आहे.