जयललिता यांच्या भूमिकेत कंगना राणावत

0 2

मुंबई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर बायोपिक बनवला जात आहे. यात कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटातील जयललिता यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तेलुगू अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या नावांची चर्चा सुरु होती. परंतु आता कंगनाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

तरण आदर्श यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट तामिळ भाषेत ‘थलाइवी’ तर हिंदी भाषेत ‘जया’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.