जळगावचे मू. जे. महाविद्यालय ‘स्वायत्त’

0

जळगाव – शैक्षणिक वर्ष 2019 -20 पासून खान्देश कॉलेज एज्युकेशन संस्थेच्या मूळजी जेठा महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने 10 वर्षांसाठी स्वायत्तता (2018-29 साठी ) घोषित केल्याचे पत्र प्राप्त झाले. ‘ज्ञानप्रसारो व्रतम’ हे ब्रीद वाक्य घेऊन 1944 मध्ये स्थापन झालेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन संस्थेने आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व पहिले आणि संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखली आहे.

गेल्या वर्षी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करून नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार झालेल्या नॅक पुनर्मूल्यांकनामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयाने सतत तिसर्‍या वेळी नॅकची ए श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच महाविद्यालयास कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स आणि त्यानंतर कॉलेज ऑफ एक्सलन्सचा दर्जा प्राप्त झाला. यापुढील टप्पा स्वायत्त महाविद्यालयाचा होता. सप्टेंबर 2018 मध्ये महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास स्वायत्ततेचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव विद्यापीठाने शिफारस करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविला. आयोगाच्या समितीने 1 व 2 फेब्रुवारी 2019 रोजी महाविद्यालयास भेट देऊन अहवालवजा शिफारस आयोगाकडे केली. त्याआधारे विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान केल्याचे पत्र पाठविले.

गेल्या वर्षी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करून नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार झालेल्या नॅक पुनर्मूल्यांकनामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयाने सतत तिसर्‍या वेळी नॅकची ए श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच महाविद्यालयास कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स आणि त्यानंतर कॉलेज ऑफ एक्सलन्सचा दर्जा प्राप्त झाला. यापुढील टप्पा स्वायत्त महाविद्यालयाचा होता. सप्टेंबर 2018 मध्ये महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास स्वायत्ततेचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव विद्यापीठाने शिफारस करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविला. आयोगाच्या समितीने 1 व 2 फेब्रुवारी 2019 रोजी महाविद्यालयास भेट देऊन अहवालवजा शिफारस आयोगाकडे केली. त्याआधारे विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान केल्याचे पत्र पाठविले. बदलत्या काळानुसार सर्वोत्कृष्टता हे ध्येय समोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे सहककारी गेल्या 10 वर्षापासून शैक्षणिक स्वायत्ततेच्या प्रतीक्षेत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.कुलकर्णी, संस्थेचे शैक्षणिक संचालक प्रा.डॉ.दिलीप हुंडीवाले, प्रा.डॉ.सं. ना. भारंबे व इतर सहकार्‍यांचे अभिनंदन केले.

स्वायत्ततेमुळे दर्जेदार अभ्यासक्रम

स्वायत्ततेमुळे महाविद्यालयास आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जून 2019 पासून महाविद्यालयाचे स्वत:चे अधिक दर्जेदार व उपयोजित अभ्यासक्रम असतील. शिक्षककेंद्रित अभ्यासक्रमाऐवजी विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमांना प्राधान्य असेल. विद्यार्थ्यांसाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबविण्यावर भर असेल. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.