जळगावमध्ये भाजपाकडून आमदार स्मिता वाघ

0

जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांचे तिकिट कापण्यात आले असून, त्यांच्या ऐवजी आमदार स्मिता वाघ यांना भाजापाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील हे स्वत: पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. याशिवाय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रकाश पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, आमदार उन्मेश पाटील यांचीही नावे चर्चेत होती. शुक्रवारी रात्री उशिरा पक्षाने जाहीर केलेल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. वाघ यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याबरोबर होणार आहे.